पालक आपल्या मुलांना अशा आशयाचं कार्टुन का दाखवतात? सुयश टिळक चा संतप्त सवाल

समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत सोशल मीडियावर मराठी कलाकार नेहमीच आवाज उठवतात. पुढचं पाऊल, का रे दुरावा, दुर्वा अशा मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक याने त्याच्या समोरच घडलेल्या प्रसंग शेयर करत स्मार्टफोनमुळे लहान मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केला.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सध्या स्मार्टफोनचे वेड लागले आहे. अगदी ३-४ वर्षांची लहान मुले अनेकदा त्यांच्या मोबाईलवर कार्टून पाहिल्याशिवाय जेवत सुद्धा नाहीत… मग रडायला लागतात आणि त्याला वैतागून शेवटी पालकच स्वतः त्यांच्या हातात मोबाईल देतात. पण याच मोबाईल फोनवर पाहिल्या जाणाऱ्या कार्टुन्सचे लहान मुलांवर भयंकर परिणाम होण्याचीही शक्यता असते. याबाबतीत अभिनेता सुयश टिळकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेयर करत संताप व्यक्त केला.

सुयश व्हिडिओत म्हटलं कि , “मी आताच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो. तिकडे माझ्या शेजारच्या टेबलवर एक कुटुंब बसलं होतं. त्यांच्याबरोबर एक तीन ते चार वर्षांची मुलगी होती. ती मुलगी प्रचंड रडत होती. त्यामुळे तिच्या आई-बाबांनी तिला स्मार्टफोनवर मोठ्या आवाजात एका कार्टुन लावून दिलं. मी सहसा असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण, हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न असतो. पण, त्या मोठ्या आवाजात लावलेल्या कार्टुनचे काही संवाद माझ्या कानावर पडले.”

“त्या कार्टुनमधले ते संवाद ऐकून मला खरंच राहावलं नाही म्हणून हा व्हिडीओ मी करतोय. त्या कार्टुनमध्ये दोन मुलं आणि एक मुलगी असते.
त्यातला एक मुलगा मुलीला उद्देशून म्हणतो, ‘तुम कितनी क्यूट हो, क्या तुम्हे मैं प्यार से दीदी पुकार सकता हूं?’ त्यावर त्या मुलाचा मित्र त्याला मागून मारतो आणि म्हणतो, ‘अबे तू उसे प्रपोज करने आया था ना फिर दीदी क्यू बोल रहा है?’ यावर पुन्हा पहिला मुलगा त्या मुलीला म्हणतो, ‘मैं तो मजाक कर रहा था…क्या तुम्हे मैं प्यार से डिअर डार्लिंग बुला सकता हूं?’ या सगळ्यावर ती कार्टुनमधली मुलगी हसते आणि म्हणते, ‘तुम कितने क्युट हो…’ शेवटी तो मित्र म्हणतो ‘अरे वाह भाई तेरी तो निकल पडी.”

सुयशने या प्रकारावर नाराजी व्यक्त करत म्हटले कि “या अशा आशयाचं कार्टुन नेमकं कोण बनवतंय आणि मुळात आजकालचे पालक आपल्या मुलांना हे अशा आशयाचं कार्टुन का दाखवतात? हे माझ्या समजण्यापलीकडे आहे.”

सुयशने उपस्थित केलेला प्रश्न रास्त असून हा आता संपूर्ण पिढीसमोरच हे एक मोठं आव्हान उभे राहिलेले आहे अशी प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लोकांनी व्यक्त केली.

Exit mobile version