महाराष्ट्राची लाडकी जोडी असलेले रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टीव्ह असतात. ते अनेकदा एकत्र एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. त्यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली असून त्यांना दोन गोंडस मुले ही आहेत. आता लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा ते बऱ्याच वर्षांपासून विचार करत होते. समाजाप्रती आपले कर्तव्य समजून दोघांनी ही आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) ने ट्विटरवर चाहत्यांसह एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह या रितेश-जेनेलियाचे आभार आणि प्रशंसा करताना एक व्हिडिओ शेअर केला.
पालक आपल्या मुलांना अशा आशयाचं कार्टुन का दाखवतात? सुयश टिळक चा संतप्त सवाल
या आधी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अवयवदानाबद्दल बोलताना रितेश देशमुखने सांगितले की, “माझे वडील विलासराव देशमुख यांचे यकृत प्रत्यारोपण करायचे होते. ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आम्हा सर्वांना वाटले की, शस्त्रक्रिया करण्यासाठी यकृत उपलब्ध होईल पण ते उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता पण काही वैद्यकीय अडचणींमुळे ते शक्य झाले नाही,” यानंतर या कार्यक्रमातुन रितेश देशमुखनं सर्व नागरिकांना अवयवदान करण्यासाठी विनंती केली होती.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोणते अवयवदान करता येतात ?
जर तुम्ही अवयवदान करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड कॉर्निया (डोळ्याचा भाग) आणि आतडे दान करू शकता. याशिवाय आपण टिश्यू देखील दान करू शकतो.
अवयवदान कसे कार्य करते?
१८ वर्षांनंतर कोणीही व्यक्ती आपले अवयवदान करू शकतो. जिवंत अवयवदान आणि मृत अवयवदान या अवयवदान करण्याच्या दोन पद्धती आहेत. जिवंत अवयवदाता त्याच्या मृत्यूनंतर शरीराचे कोणते अवयव दान केले जातील हे इच्छापत्रात नमूद करतो. तर कोणत्या मृत व्यक्तीच्या पश्चात डॉक्टरच्या सल्ल्याने आणि नातेवाईकाच्या परवानगीने अवयवदान करू शकतात.