२०२२ मध्ये आलेला धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे चित्रपट मराठीत चांगलाच गाजला होता. त्यानंतर याचा दुसरा भाग कधी होणार अशी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता या धर्मवीर २ या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज झालेला आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित असेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये राखीपौर्णीमेला आनंद दिघे साहेबांना राखी बांधायला आलेल्या असतात. त्यातच एक मुस्लिम महिला नगमा राखी बांधायला आलेली असते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तेव्हा समजतं की तिचा नवरा तिला मारहाण करतो. हे पाहताच आनंद दिघे संतापतात आणि शेकडो बहिणींसोबत नगमाच्या पतीला आनंद दिघे स्टाईल मध्ये धडा शिकवायला निघतात ! ”ज्याच्या घरातील स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की” या दिघे साहेबांचे पात्र साकारणाऱ्या प्रसाद ओकच्या डायलॉगने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.
“धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून महेश लिमये यांनी छायाचित्रणाची कामगिरी बजावली आहे. प्रसाद ओक अभिनित हा चित्रपट ९ ऑगस्ट म्हणजेच क्रांतीदिनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार असून या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे !