तब्ब्ल 5 वर्षानंतर चित्रपटाचा तिसरा भाग ये रे ये रे पैसा 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुन्हा संजय जाधव दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला संजय जाधव दिग्दर्शित ये रे ये रे पैसा हा चित्रपट चांगलाच गाजला. 2019 मध्ये त्याचा सिक्वेल ये रे ये रे पैसा 2 देखील रिलीज झाला पण अपेक्षेप्रमाणे त्याला यश मिळू शकले नव्हते. आता तब्ब्ल 5 वर्षानंतर याचा तिसरा भाग ये रे ये रे पैसा 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुन्हा संजय जाधव दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
तिसऱ्या भागात परतले पहिल्या भागाचे मुख्य कलाकार
पहिल्या भागातील मुख्य कलाकार उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित आणि संजय नार्वेकर या भागात पुन्हा दिसणार आहेत. दुसऱ्या भागात पहिले 3 कलाकार नव्हते आणि त्याचे कथानकही वेगळे होते. कदाचित या तिसऱ्या भागात तेच मुख्य 3 पात्र पुन्हा एकदा एकत्र येऊन कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात कसा त्यांचा गडबड गोंधळ उडवतील हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच सोबत नवे कलाकार वनिता खरातसह नागेश भोसले, जयवंत वाडकर हे हि दिसणार आहेत.
कलाकारांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन !
आज येरे येरे पैसा 3 चित्रपटाचा मुहूर्त सिद्धिविनायकचरणी पार पाडला असून सर्व कलाकारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले याठिकाणी आमदार योगेश टिळेकर, निर्माते- दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी उपस्थित होते.
चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे. तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर आरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत.
याठिकाणी नागेश भोसले यांच्यासह पहिलाच मुहूर्त शॉट सुरळीत पार पाडला असून ते पोलीस इस्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसतील.
उत्तम स्टारकास्ट आणि मनोरंजक स्टोरी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यासोबतच बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने यावेळेस व्यक्त केला.